रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना

 

रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना Ruperi Valut Madanchya Banaat Lyrics

Music: Anil-Arun
Lyrics: Shantaram Nandgaonkar
Singer(s): Asha Bhosale

रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल, लावित प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना

बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहावरी फुले असा शहारा
तुझा इशारा, असा शहारा

लाजेत आज ही फुले नहाती
गाली अनार प्रीतगीत गाती
तू ये निशा अशी करे पुकारा
दे ये प्रिया मला तुझा निवारा
तुझा निवारा, तुझा निवारा

Comments

Popular posts from this blog

nako nakona re lyrics

नवरी आली