अधिर मन झाले
Adhir Man Jhale Lyrics
Song: Adhir Man Jhale
Movie: Nilkanth Master
Music: Ajay Atul.
Lyricst: Gajendra Ahire
Singer: Shreya Ghoshal
Starring: Vikram Gokhale, Adinath Kothare, Kishore Kadam, Omkar Govardhan, Neha Mahajan, Pooja Sawant
Director: Gajendra Ahire
अधिर मन झाले मधुर घन आले
धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
अधिर मन झाले
धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
मधुर घन आले
मी अश्या रंगाची मोतीया अंगाची
केवड्या गंधाची बहरले ना
उमगले रानाला देठाला पानाला
माझ्या सरदाराला समजले ना
आला रे काळजा घाला रे
झेलला भाला रे गगन भरी झाले रे
अधिर मन झाले मधुर घन आले
सोसला वारा मी झेलल्या धारा मी
प्यायला पारा मी बहकले ना
गावच्या पोरांनी रानाच्या मोरांनी
शिवारी साऱ्यांनी पाहिले ना
उठली रे हूल ही उठली रे
चाल रीत सुटली रे नि लाजरी झाले रे
अधिर मन…!
मधुर घन…!
धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे.
Comments
Post a Comment