ये ना साजना

                                           Ye Na Sajana Lyrics – Lai Bhaari

Song: Ye Na Sajana
Movie: Lai Bhaari
Music: Ajay – Atul
Singer: Shreya Ghoshal.
Lyricst: Guru Thakur
Starring: Riteish Deshmukh, Radhika Apte, Sharad Kelkar, Tanvi Azmi & Salman Khan
Director: Nishikant Kamat

ये ना साजना

करतो इशारा आवेग माझ्या
बेभान श्वासातला
पेटू दे आता, चेतू दे आता
अंगार देहातला
हा गार वारा फुलणारा शहारा
या देहावरला आता मला सोसेना रे
ओठांचा माझ्या हा प्याला भरलेला
रे आतुरलेला, ओठी तुझ्या लाव ना रे
ये ना साजणा बरसून घे
ये ना साजणा स्पर्शून घे
घे ना रे

करतो इशारा आवेग माझ्या
बेभान श्वासातला

पिसाटलेला उधाणलेला
हा जीवघेणा नशीला समा
आसुसलेल्या मिठीत ओल्या
घायाळ हो ना जरा साजणा
स्पर्शातील गोडी अन् वेडी
छळणारी ही हुरहूर थोडी रोखू कशी सांग ना रे
ओठांचा माझ्या हा प्याला भरलेला
रे आतुरलेला, ओठी तुझ्या लाव ना रे
ये ना साजणा बरसून घे
ये ना साजणा स्पर्शून घे
घे ना रे

बेभान काया ही मोहराया
व्याकुळ ही रात रे कोवळी
खुलवून जा ना फुलवून जा ना
अलवार तू पाकळी पाकळी
हा गोठलेला थिजलेला
भिजलेला सजणा विझलेला
एकांत शिलगाव ना रे
हा गार वारा फुलणारा शहारा
या देहावरला आता मला सोसेना रे
ये ना साजणा बरसून घे
ये ना साजणा स्पर्शून घे
घे ना रे

Comments

Popular posts from this blog

रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना

nako nakona re lyrics

नवरी आली