आम्ही ठाकर ठाकर
आम्ही ठाकर ठाकर Aamhi Thakara Thakara
Lyrics: N. D. Mahanor
Singer(s): Chandrakant Kale and Ravindra Sathe
Music on: SAREGAMA Marathi
आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखरं
या झांबर्या गर्दीत मांडुन इवले घर.
या पिकल्या शेतांवर तुझ्या आभाळाचा जर
या डोंगरवस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार.
आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून धरलीया झालर.
Comments
Post a Comment